Thursday, 5 July 2018

एक भावी डॉक्‍टर जगण्याचे अधिकार देतोय...

जलाने वाले जलाते ही हैं चराग आखिर
ये क्या कहा कि हवा तेज़ है ज़माने की

जमील मजहरी यांचा हा शेर. काही दिवसापूर्वीच २३ वर्षाचा झालेला अश्विनी पाराशरवर हा शेर एकदम फिट बसतो. धौलपूरमध्ये वाढलेला, शिकलेला. अश्विनी एमबीबीएसची विद्यार्थी असून तो जयपूरमधील सवाई मानसिंग मेडिकल कॉलेजमध्ये इंटर्नशिप करतो. एमबीबीएस करणारा डॉक्‍टर मुलगा ही त्याची ओळख नाही, तर त्याची खरी ओळख आहे आपण एक सजग नागारिक असल्याची. आपल्याबरोबर असणार्‍या प्रत्येक माणसाचं आयुष्य सुखी करण्यासाठी तो धडपतड आहे. आपला अभ्यास आणि आपली इंटर्नशिप सांभाळत तो हे सगळं करतो. सरकारकडून स्‍वातंत्र्य देशात जे ७० वर्षात झालं नाही ते तो करण्याचा प्रयत्‍न करते.
खरं तर त्याच्या बदलाची सुरूवात, त्या बदलाच्या संघर्षाची कहाणी सुरू होते २०१६ च्या दिवाळीपासून. दिवाळीच्या सुट्टीत तो जेव्‍हा घरी गेला तेव्‍हा त्याला नकळत वाटलं की, यावर्षीची दिवाळी अनोखी करू. आपल्यासाठी नसली तरी ती दुसर्‍यांसाठी अनोखी असेल. दिवाळीचा आनंद, मौज मज्जा मला सहज मिळते, पण काही माणसं आहेत जी साध्या गोष्टीसाठी मोठा संघर्ष करतात. त्या संघर्ष करणार्‍या माणसात जाऊन आपण दिवाळी का साजरी करू नये असं तिला सहज तेवढ्याच आत्‍मीयतेनं वाटलं, तर अश्विनीने अडीच वर्षापूर्वी काही मित्राबरोबर पैसे गोळा केले. या पैशातून त्याने मिठाई, कपडे, फटाके आणि पुस्‍तकं खरीदी केली. मग तिचा प्रवास राजस्‍थान आणि मध्य प्रदेशमधील राजघाटच्या दिशेने सुरू झाला. या दिशेने जातानाचा त्याचा अनुभव विचार करायला भाग पाडतो. तो सांगतो की, जेव्‍हा आम्‍ही हे घेतलेले साहित्य वाटण्यास सुरूवात केली तेव्‍हा अगदी येथील लोकांनी हिसकावून घेण्याचा प्रयत्‍न केला. यामध्ये त्याला त्यांची चूक वाटत नाही. कारण माणसं या सगळ्यापासून वंचित होती आणि आहेत. धौलपूरपासून पाच किलोमीटरवर असलेले महज गावाची आठवण सांगताना तो म्‍हणतो की, आजही त्या गावात वीज नाही, पडक्‍या भिंतीची घरं अजून तिथे आहेत. पाण्यासाठी सरकारने गावात कुपनलिका दिली आहे पण त्याचं पाणी खारट आहे. जे आरोग्यासाठी धोक्‍याचं आहे तरीही ती माणसं तेच पाणी पितात आणि आयुष्य जगतात. ना त्यांच्याकडं प्रशासनाचं लक्ष आहे, ना सरकारचं आहे. मित्रांच्या मदतीनं हे सगळं बघून आपण कोणत्या देशात राहतो अस नकळत वाटून गेलं असं तो भावूकपणे सांगतो.

तो जेव्‍हा राजघाटाच्या पाण्याचा अनुभव सांगतो तेव्‍हा ती काळ्या पाण्याचीच शिक्षा वाटते. राजघाटची माणसं पाण्यासाठी चंबल नदीवरच अवलंबून आहेत. या नदीतील पाणी माणसं पितात कसं ? हे तो स्‍वत:च विचारते. तो सांगते की या नदीत मेलेली जनावरं, आणि मेलेली माणसांचे मृतदेह आढळून येतात, आणि ही सगळी घाण बाजूला करून ही माणसं ते पाणी पितात. घाण पाणी प्यावं तर लागतच या माणसांना पण पाणी काढतानाही जीव धोक्‍यात घालून पाणी भरावं लागतं. नदीत मगर आहेत आणि मगरीच्या हल्‍ल्यात येथील अनेक युवकांनी आपला जीव गमवावा लागला आहे.
राजघाटमध्ये शाळा म्‍हणून एक छोटी इमारत आहे. तिथे सगळ्या शाळेसाठी एकच शिक्षक आहेत. गावात कुठलीच आरोग्याची व्‍यवस्‍था नाही. दुकान नाही. मागासलेपणाचा एन नमुना म्‍हणून राजघाटकडे मी पाहत होतो. येथील अनेक माणसं दारूच्या आहारी गेली आहेत. व्‍यसनामुळे येथील अनेकांची लग्न झालेली नाहीत. लग्न न होणं हिच एक येथील मोठी समस्या बनली आहे.
तो म्‍हणतो मी शहरात राहतो. मला याची कधी जाणीवच झाली नाही की माझ्या आसपासचे लोक इतक्‍या वाईट पध्दतीने आयुष्य जगतात. मला सगळ्यात धक्‍कादायक कुठलं होतं असेल तर माणसांची मढी बाजूला करून घागरीत पाणी भरणं. हे माझ्यासाठी भयानक वास्‍तव होतं. हे बघून मी कॉलेजमध्ये जाऊन पैसे गोळा केला आणि पाण्यासाठी गाववाल्यांना फिल्‍टर देण्याची कल्‍पना मांडली. त्यावेळी मला सुचवण्यात आलं की, फक्‍त रोगावर इलाज नको तर रोगच नाहीसा केला पाहिजे यासाठी काय करता येतं बघं.
मग माणसांच्या जीवासाठी तो प्रशासनातील कुठल्याच अधिकार्‍याला त्यानं सोडलं नाही. स्‍थानिक नेते, मंत्री, मुख्यमंत्री सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यानं लोकांसाठी झगडा चालू ठेवला, पण त्याला उत्तर मिळण्याएवेजी त्याला टाळणारी लोकं, अधिकारी जास्‍त मिळाली. गावासाठी प्रशासनाच्या पातळीवर काम करताना त्याच्या लक्षात आलं की, हे गाव तर नगरपरिषदेच्या हद्दीत येतं मात्र, नगरपरिषदेच्या कुठल्याचा योजना, सोयी सुविधा गावाला मिळत नाही.
तो म्‍हणतो की कुणी सांगतें नगरपरिषदेकडे फंड नाही, तर कोण म्‍हणतं हे गाव नो कन्‍स्ट्रक्‍शनमध्ये येतं. मग मीच प्रशासनाला विचारलं हे गाव नो कन्‍स्ट्रक्‍शनमध्ये येत असेल तर शाळेची इमारत का बांधली. या प्रश्नाचं त्याला उत्तर मिळालं नाही, म्‍हणून मग थेट त्यानं प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहिलं. या पत्रानंतर मात्र पंतप्रधान कार्यालयातूनच हालचाली सुरू झाल्या. पंतप्रधान कार्यालयाकडून पत्र आलं आणि जिल्‍हाधिकारी, एसपी, आयुक्‍त यांच्याबरोबर सगळेच अधिकारी गावात पोहचले. 

ज्या दिवशी सगळं प्रशासन गावात पोहचलं तेव्‍हा ते चित्र म्‍हणजे सगळा फिल्‍मी सीन होता. प्रशासनाचा लवाजमा गावात दाखल होईपर्यंत सगळ्या गाववाल्यांना वाटत होतं की हे एकटं पोरंग काय करणार, कुठं पर्यंत जाणार, पण आता गावावाल्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. मला आता बदलाची मोठी आशा आहे, आणि गाव बदलणार हा विश्वास आहे.
राजघाटच्या दौर्‍यानंतर सरकारी प्रशासन, नेत्यांकडून ढिगभर अश्वासनं मिळाली, महिनो महिने निघून गेले पण आजही तिच परिस्‍थिती आहे. पुन्‍हा या गावासाठी जेव्‍हा मी सरकारी कार्यालयात जातो तेव्‍हा मला सल्‍ला मिळतो, डॉक्‍टरकी कर, त्यात ध्यान दे. आणि हे काम काही डॉक्‍टरांचं नाही त्यासाठी नेते आहेत. देशात अशी एक नाही हजारो गावं आहेत मग या एका गावाचं काय घेऊन बसला आहेस. एका गावाच बदल करून देश बदलणार नाही असा सल्‍ला त्याला देतात तेव्‍हा तो हसतो आणि आपल्या कामात व्‍यस्‍त होतो.
अश्विनीला अनेक वेळा मान अपमान सहन करावा लागला पण तो मागे हटला नाही. त्याने राजघाट वाचवा अशी मोहीम राबवली. लोकांकडून देश विदेशातून निधी जमवला.या निधीतून त्याने सोलर दिव्‍याची व्‍यवस्‍था केली आणि ही व्‍यवस्‍था त्याने पुर्ण गावात केली नाही तर अशा पाच घरातून केली ज्या घरातील मुलं पाचवी आणि त्यापुढे शिकतात. २०१८ च्या सुरूवातीला मात्र पुरं गाव त्यानं दिव्याखाली आणलं. अश्विनीनं केलं ते सरकारच्या जीवावर नाही तर स्‍वत: च्या हिम्‍मतीवर.
सरकारच्या लाल फितीपासुन निराश होऊन मग त्याने माहितीच्या अधिकाराखाली राजघाट व धौलपूरसाठी नगरपरिषदेन रस्‍ता, पाणी आणि विजेसाठी काय योजना आखल्या आहेत याची माहिती मागितली आणि राजस्‍थान उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. यामध्ये त्याने म्‍हटले की राजघाट व धौलपूरसाठी मुलभूत अधिकार देण्यामध्ये सरकार अपयशी ठरलं आहे. या याचिकेवर आजपर्यंत दोन वेळा सुनावणी झाली आहे. याचिकेचा परिणाम असा झाला की आता गावात प्रत्येक घरात शौचालय आली आहेत. विजेचे खांब उभा करण्यात आले आहेत. सरकारी काम दोन महिने थांब या उक्‍तीनुसार काम चालत असल्याने आम्‍ही सरकारची वाट बघत बसला नाही मग २६ जानेवारी रोजी २५ घरात शुध्द पाण्याची व्‍यवस्‍था केली आहे.
अश्विनीच्या कष्टाला फळ म्‍हणजे गावातील लोकं आता दारू पित नाहीत. गावातील सगळ्या मुलांनी आता शाळेचा रस्‍ता धरला आहे. सरकारी कामं म्‍हणून आपण प्रशासन आणि राजकारण्यांना नावं ठेवतो, मात्र अश्विनी तसं करत नाही. तो आपली जबाबदारी आहे असं मानतो. अश्विनीचा हा प्रवास सहज सोपा नव्‍हता. दीर्घ संघर्षानंतर त्याला आता थोडा आता परिणाम दिसू लागला आहे आणि हे कधीतरी बदलेल हिच त्याची आशा आहे.

सत्याग्रहातून अनुवाद : महादेव पार्वती रामचंद्र

3 comments:

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...