...तुझ्या जन्माआधी काही क्षण मी सुभाष भेंडेंची जोगीण कादंबरी हाॅस्पिटलच्या एका खिडकीत बसून वाचून संपवली. त्यातली बर्नी मला प्रचंड अस्वस्थ करुन गेली होती आणि तेव्हाच डाॅ. विद्यानी मला आपल्या केबिनमध्ये बोलवलं. तेव्हा माझ्या डोक्यात कित्येक विचारांचा काहूर माजला होता. त्याक्षणी तुझी आई आजारी आणि अशक्त वाटत होती. रुग्णालयातल्या त्या कुंद आणि कोमजल्या वातावरणात मनस्विनी मला आता आणखी आणखी अस्वस्थ आणि बिचारी वाटू लागली. केबिनमध्ये जात असताना चेहरा मलूल करून मनस्विनी माझ्याकडे एकटक बघत होती. तिचा त्रास सुरूच होता पण आईपणाचं सुखही ती आपल्या चेहर्यावरून लपवू शकत नव्हती, पण तिचं अशक्तपण तिच्या चालण्यावरून स्पष्टपणे जाणवत होतं. मी तिला कितीदा तरी विचारत होतो, आरयू ओके? मग मनस्विनी मान हलवून होकार देत होती. त्यावेळी मला बरं वाटत असलं तरी मनात भितीची सावट कायम होती. आईपण सोप्प नाही पण माझ्या आईपासून ते जगातल्या तमाम बाया ही अवघड आणि क्लिष्ठ वाट कसं चोखंदळत असतील असंही त्यावेळी वाटत राहिलं. मी आमच्या आईच्या पोटात असताना म्हणे सोईन बाया मला शिव्या देत म्हणायच्या कसा ग राहिला हा पोटात, आणि या बाईनं म्हणजे माझ्या आईनं कसं ग सांभाळलं याला. असं काय काय तुझ्या जन्मावेळी मला वाटत राहिलं. मग पुन्हा मी मनस्विनीकडे गेलो आणि सांगितलं की आता लगेच तुला आॅपरेशन थिएटरमध्ये घेताहेत, भिऊ नकोस, घट्ट आणि खंबीर रहा. तेव्हा डोळे किलकिले करून माझ्याकडे पाहत तिनं ओके म्हटली आणि हळूहळू ड्रेसिंगरूममध्ये निघून गेली. मग तुझ्या जन्मानंतर ती अकरा बारा तास कुणाशीच काहीच बोलली नाही. पण ड्रेसिंग रुममधून काही क्षणात तिला व्हिलचेअरवरून सिस्टरनी बाहेर घेऊन आल्या. तेव्हा तर माझ्या पोटात केवढा तर मोठ्ठा खड्डा पडला. क्षणात कसले कसले विचार मनात येऊन गेले. तेव्हीही बाईच्या वाट्याला येणारं आईपण म्हणजे दुसरा जन्म आणि जन्मांतरीचा आरंभ असतो असं वाटलं. या जगात आईपणापेक्षा अवघड दुसरं काहीच नसेल. आणि या काळात सोबत असणारे डाॅक्टर आणि नर्स म्हणजे किमयागारच असतात असं वाटलं. दोन जीवांना ते सहीसलामत पुन्हा त्याच जगात आणत असतात, आणि बिचारे पुन्हा आपापल्या मार्गानं निघून जातात.
आता मला काय वाटतं माहितीय, तुला समजलं असतं, तर असा रात्रभर बसून तुझ्या जन्माआधीचे सगळे क्षण आणि क्षण टिपून सांगितले असते आणि म्हटलं असतं हे असं ताठपणे असं तुझ्या आईसमोर बसू नकोस माझ्यासमोर तुझी नम्रता दाखवली नसलीस तरी चालेल पण आईसमोर मग ती कुणाच्याही असूदेत तू तिथं नम्रच असलं पाहिजे आणि तेच तुझ्याकरावी आमचं मोठेपण असेल.(ही तशी भोळी आणि भाबडी आशा) आणि तू उमलून फुलण्याआधीच मी तुझ्यावर बंधनाचे जोखड ठेऊ. असो. हे सगळं वाटत असलं तरी तुझ्या येण्यानं आम्ही प्रचंड खुशय. तुझी आई, आजी आजोबा, मामा, मावशी, आत्या, काका, काकू यांना सगळं जग आता ठेंगणं झालय. आता पुन्हा नव्यानं सगळी नातीगोती अशी एकमेकात गुंफून राहिलेत. याचं सगळं श्रेय तुला आणि मनस्विनीलाच...
आता मला नीटसं तुला सांगता येणार नाही पण जेव्हा तू मोठी होशील तेव्हा हे मला सगळंच आठवेल की नाही कुणास ठाऊक म्हणूनच हे आताच तुला सांगतोय. आता सगळं घर तुमच झालय बघ आता पुरूष म्हणून आबा आणि मी आम्ही दोघच की घरात. आता तुमचच राज्य असणार. आई, मनस्विनी आणि तू. निर्णयाच्या कुठल्याही क्षणी तीन आणि दोन असच आता मतदान होत राहिल आणि तुमचं राज्य आमच्यावर स्वार होत राहिल. ते असच होत रहावा एवढचं.

खरंय बाळाची नाळ आईशी जेवढी जोडलेली असते तेवढीच ती बापाच्या अंतःकरणाशी! आणि ते बाळ 'लेक' असेल तर मग बोलायलाच नको! मित्रा 'अर्चना जगन्नाथ माने' या नावात ना कोणती चळवळ आहे ना कोणते तत्व...आहे तो फक्त लेकीचा बाप आणि बापाची लेक!!....तुझं आणि तुझ्या लेकीचं नातं असच खूप रुजू दे...बहरुदे...सजू दे !!! तुला 'बापपण' देणाऱ्या मनुचं आणि तुझं खूप खूप अभिनंदन!!!
ReplyDelete