Monday, 8 October 2018

संस्‍कारी माणसांकडूनच जेव्‍हा बलात्‍कार होतो


टीव्‍ही मालिका लेखिका, दिग्दर्शक, आणि निर्माती विंता नंदा यांनी नव्‍वदच्या दशकात तारा नावाची एक मालिका केली होती. तारा मालिकेतील मुख्य अभिनेता आणि ज्यांची ओळख संस्‍कारी अभिनेता आहे त्यांच्यावरच विंताने बलात्‍कार केला असल्याचा केला आहे.विंता नंदा यांनी फेसबुकवर आपल्या आयुष्यातील या वाईट घटनेविषयी दिर्घ अशी पोस्‍ट लिहून वीस वर्षापूर्वी झालेल्या बलात्‍काराची माहिती दिली आहे. 

विंता यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्‍टमध्ये कुठेही त्या कलाकाराचे नाव लिहिले नाही, मात्र तारा मालिकेत मुख्य भूमिका असलेला आणि त्या दशकात टीव्‍ही मालिकांमधील प्रसिद्ध कलाकार आलोक नाथ होता हेच यातून स्‍पष्ट होते. 

या पोस्‍टमध्ये विंता यांनी अत्‍याचार केला त्याच्याविषयी लिहिताना म्‍हटले आहे की, तो दारुडा आणि नालायक माणूस होता. हे सगळं असलं तरी त्‍याकाळातील तो सगळ्यात मोठा कलाकार होता. त्याच्या वाईट सवयीमुळे त्याला कुणीही माफ करणार नाही मात्र ते वाईट गोष्टी करण्यासाठी त्याला अनेक लोकं पूस लावत होते.

विंता या फेसबुकच्या पोस्‍टमध्ये सांगते की, हा संस्‍कारी कलाकार हात धुऊन मागे लागला. संस्‍कारी पुरूष असल्याने कुणी त्यावेळी कुणी बोलायला धजत नव्‍हते मात्र यावेळी त्या अभिनेत्रीचं लैंगिक शोषण या संस्‍कारी पुरूषानेच केले होते. हे ही विसरून चालणार नाही. यानंतर घडलेली गोष्ट विंताने चॅनेल प्रशसनाच्या कानावर घातली, विंताने त्याचवेळी ठरवून टाकले की या कलाकाराला आता मालिकेतून बाहेर ठेवणं हेच सोयीचं होईल. हा निर्णयही तिने चॅनेलला कळवला.

त्या कलाकारला काढून टाकण्याचं ठरल्यानंतर त्या कलाकारासोबत शेवटचा सीन करण्याचे ठरले. त्याच्या शुटींगच्या शेवटच्या दिवशी शेवटचा भाग चित्रीकरण करताना संस्‍कारी कलाकार दारूच्या नशेत होते. सेटवर उभा राहता येत नव्‍हते. लाईट-कॅमेरा-ॲक्‍शन म्‍हटले आणि हे महाशय मुख्य अभिनेत्रीच्या अंगावर पडले. सेटवर गोंधळ झाला, अभिनेत्रीला सहन झालं नाही म्‍हणून मग तिने एका ज्येष्ठ अभिनेत्यावरच हात उचलला. त्यावेळी कोणतेच मग आडपडदे आले नाहीत. 

या घटनेनतंर त्या कलाकाराला काढून टाकण्याचा निर्णय मी चॅनेलच्या व्‍यवस्‍थापनाला कळवला. त्यानंतर निर्णयानंतर पटकथेत बदल करण्याचे सुचवण्यात आले, मात्र पुन्‍हा त्याच अभिनेत्याला मालिकेत घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. याबाबतीत चॅनेल व्‍यवस्‍थापनाकडून जेवढा त्रास द्यायचा आहे देण्यात आला.
विंताने आपल्या पोस्‍टमध्ये पुढे जाऊन लिहिले आहे की, या अभिनेत्याकडून एकदाच नाही तर चार वेळा बलात्‍कार करण्यात आला. ती म्‍हणते की पार्टीनिमित्त मुख्य अभिनेत्रीला त्यांच्या घरी बोलवण्यात आलं. दारू पिऊन पार्टीचा रंग वाढवत होते. सिनेसृष्टीत दारू पिणं, पार्टी करणं ही बाब नवी नसली तरी यामागे अनेक घटना घडत असतात. या पार्टीत तिनेही दारू घेतली. दारू पिल्यानंतर मात्र तिला वेगळीच जाणीव झाल्याचं जाणवू लागलं. रात्रीचे दोन वाजले होते. पार्टीतील लोक आपापल्या घरी जायला निघाले. यावेळी त्यांनाही घरी जायचं होतं, मात्र यावेळी त्‍यांना कुणीही याबाबत विचारलं नाही, की चौकशी केली नाही. तिला तिथं थांबायचं नव्‍हतं म्‍हणून मग ती पायीच आपल्या घरी जायला निघाली. 

विंता पुढं म्‍हणते की, रस्‍त्यात मध्येच या माणसांने तिला आडवलं. कारमध्ये बस म्‍हटल्यावर विश्वासानं त्‍यांच्या कारमध्ये बसले. कारमध्ये बसल्यानंतर दारू देण्यात आली, आणि त्यानंतर बलात्‍कार करण्यात आला. दुसर्‍या दिवशी पुन्‍हा माझ्या घरी मला आणण्यात आलं आणि तिथंही माझ्याबरोबर असभ्य वर्तन करण्यात येत होतं.
या घटनेनतंर विंताने आपल्या मित्र परिवाराला याची माहिती दिली. आपल्याबरोबर घडलेल्या प्रसंगाबद्दल ती अनेकांशी बोलली. त्यावेळी प्रत्येकाने एकच सल्‍ला दिला की, झालेलं गेलेलं विसरून जा. या घटनेनंतर माझ्याकडे कोणतचं काम नव्‍हतं, आतून बाहेरून उद्ववस्‍त झाले होते. काही दिवसानंतर एका चॅनेलसाठी मला लेखन आणि दिग्दर्शनाचं काम मिळालं. पुन्‍हा कामाच्या निमित्तानं हाच माणूस माझ्या समोर आला, आणि त्यात त्या माणसाची मुख्य भूमिका होती.

कामाच्या पातळीवर हे सगळं विसरून गेले असले तरी त्याच्या समोर मला भितीच वाटायची. या भितीमुळेच मग मालिका निर्मात्याला सांगितलं की मी फक्‍त लेखन करीन, दिग्दर्शनाची जबाबदारी अन्य कुणाकडेही द्या. या काळात माझ्याकडे पैसाच नव्‍हता, त्यामुळेच हे काम मी सोडू शकत नव्‍हते असंही ती सांगते. या मालिकेच्या दरम्यान पुन्‍हा एकदा मला त्यांनी आपल्या घरी बोलवलं आणि पुन्‍हा माझ्यावर बलात्‍कार केला. त्यानंतर मी मालिकेच्या कोणत्याच निर्मितीत थांबले नाही बाहेर पडले पण एका विषण्ण आवस्‍थेत गेले. 

या पोस्‍टच्या अखेरच्या भागात विंता कुणाबद्दल लिहिते हे स्‍पष्ट होते. अलोक नाथ यांच्याविषयीच ती बोलतेय हे कळून येते. इथे ती लिहिते की विरोधाभास हा आहे की, ज्या दरिंद्याबद्दल मी बोलते आहे तो मोठा कलाकार आहे आणि त्याला सिनेमा आणि टीव्‍ही या सिनेजगतात सगळ्यात मोठा संस्‍कारी अभिनेता म्‍हणून मानलं जात आहे. 

स्‍वैर अनुवाद : महादवे पार्वती रामचंद्र

No comments:

Post a Comment

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...