Monday, 8 October 2018

संस्‍कारी माणसांकडूनच जेव्‍हा बलात्‍कार होतो


टीव्‍ही मालिका लेखिका, दिग्दर्शक, आणि निर्माती विंता नंदा यांनी नव्‍वदच्या दशकात तारा नावाची एक मालिका केली होती. तारा मालिकेतील मुख्य अभिनेता आणि ज्यांची ओळख संस्‍कारी अभिनेता आहे त्यांच्यावरच विंताने बलात्‍कार केला असल्याचा केला आहे.विंता नंदा यांनी फेसबुकवर आपल्या आयुष्यातील या वाईट घटनेविषयी दिर्घ अशी पोस्‍ट लिहून वीस वर्षापूर्वी झालेल्या बलात्‍काराची माहिती दिली आहे. 

विंता यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्‍टमध्ये कुठेही त्या कलाकाराचे नाव लिहिले नाही, मात्र तारा मालिकेत मुख्य भूमिका असलेला आणि त्या दशकात टीव्‍ही मालिकांमधील प्रसिद्ध कलाकार आलोक नाथ होता हेच यातून स्‍पष्ट होते. 

या पोस्‍टमध्ये विंता यांनी अत्‍याचार केला त्याच्याविषयी लिहिताना म्‍हटले आहे की, तो दारुडा आणि नालायक माणूस होता. हे सगळं असलं तरी त्‍याकाळातील तो सगळ्यात मोठा कलाकार होता. त्याच्या वाईट सवयीमुळे त्याला कुणीही माफ करणार नाही मात्र ते वाईट गोष्टी करण्यासाठी त्याला अनेक लोकं पूस लावत होते.

विंता या फेसबुकच्या पोस्‍टमध्ये सांगते की, हा संस्‍कारी कलाकार हात धुऊन मागे लागला. संस्‍कारी पुरूष असल्याने कुणी त्यावेळी कुणी बोलायला धजत नव्‍हते मात्र यावेळी त्या अभिनेत्रीचं लैंगिक शोषण या संस्‍कारी पुरूषानेच केले होते. हे ही विसरून चालणार नाही. यानंतर घडलेली गोष्ट विंताने चॅनेल प्रशसनाच्या कानावर घातली, विंताने त्याचवेळी ठरवून टाकले की या कलाकाराला आता मालिकेतून बाहेर ठेवणं हेच सोयीचं होईल. हा निर्णयही तिने चॅनेलला कळवला.

त्या कलाकारला काढून टाकण्याचं ठरल्यानंतर त्या कलाकारासोबत शेवटचा सीन करण्याचे ठरले. त्याच्या शुटींगच्या शेवटच्या दिवशी शेवटचा भाग चित्रीकरण करताना संस्‍कारी कलाकार दारूच्या नशेत होते. सेटवर उभा राहता येत नव्‍हते. लाईट-कॅमेरा-ॲक्‍शन म्‍हटले आणि हे महाशय मुख्य अभिनेत्रीच्या अंगावर पडले. सेटवर गोंधळ झाला, अभिनेत्रीला सहन झालं नाही म्‍हणून मग तिने एका ज्येष्ठ अभिनेत्यावरच हात उचलला. त्यावेळी कोणतेच मग आडपडदे आले नाहीत. 

या घटनेनतंर त्या कलाकाराला काढून टाकण्याचा निर्णय मी चॅनेलच्या व्‍यवस्‍थापनाला कळवला. त्यानंतर निर्णयानंतर पटकथेत बदल करण्याचे सुचवण्यात आले, मात्र पुन्‍हा त्याच अभिनेत्याला मालिकेत घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. याबाबतीत चॅनेल व्‍यवस्‍थापनाकडून जेवढा त्रास द्यायचा आहे देण्यात आला.
विंताने आपल्या पोस्‍टमध्ये पुढे जाऊन लिहिले आहे की, या अभिनेत्याकडून एकदाच नाही तर चार वेळा बलात्‍कार करण्यात आला. ती म्‍हणते की पार्टीनिमित्त मुख्य अभिनेत्रीला त्यांच्या घरी बोलवण्यात आलं. दारू पिऊन पार्टीचा रंग वाढवत होते. सिनेसृष्टीत दारू पिणं, पार्टी करणं ही बाब नवी नसली तरी यामागे अनेक घटना घडत असतात. या पार्टीत तिनेही दारू घेतली. दारू पिल्यानंतर मात्र तिला वेगळीच जाणीव झाल्याचं जाणवू लागलं. रात्रीचे दोन वाजले होते. पार्टीतील लोक आपापल्या घरी जायला निघाले. यावेळी त्यांनाही घरी जायचं होतं, मात्र यावेळी त्‍यांना कुणीही याबाबत विचारलं नाही, की चौकशी केली नाही. तिला तिथं थांबायचं नव्‍हतं म्‍हणून मग ती पायीच आपल्या घरी जायला निघाली. 

विंता पुढं म्‍हणते की, रस्‍त्यात मध्येच या माणसांने तिला आडवलं. कारमध्ये बस म्‍हटल्यावर विश्वासानं त्‍यांच्या कारमध्ये बसले. कारमध्ये बसल्यानंतर दारू देण्यात आली, आणि त्यानंतर बलात्‍कार करण्यात आला. दुसर्‍या दिवशी पुन्‍हा माझ्या घरी मला आणण्यात आलं आणि तिथंही माझ्याबरोबर असभ्य वर्तन करण्यात येत होतं.
या घटनेनतंर विंताने आपल्या मित्र परिवाराला याची माहिती दिली. आपल्याबरोबर घडलेल्या प्रसंगाबद्दल ती अनेकांशी बोलली. त्यावेळी प्रत्येकाने एकच सल्‍ला दिला की, झालेलं गेलेलं विसरून जा. या घटनेनंतर माझ्याकडे कोणतचं काम नव्‍हतं, आतून बाहेरून उद्ववस्‍त झाले होते. काही दिवसानंतर एका चॅनेलसाठी मला लेखन आणि दिग्दर्शनाचं काम मिळालं. पुन्‍हा कामाच्या निमित्तानं हाच माणूस माझ्या समोर आला, आणि त्यात त्या माणसाची मुख्य भूमिका होती.

कामाच्या पातळीवर हे सगळं विसरून गेले असले तरी त्याच्या समोर मला भितीच वाटायची. या भितीमुळेच मग मालिका निर्मात्याला सांगितलं की मी फक्‍त लेखन करीन, दिग्दर्शनाची जबाबदारी अन्य कुणाकडेही द्या. या काळात माझ्याकडे पैसाच नव्‍हता, त्यामुळेच हे काम मी सोडू शकत नव्‍हते असंही ती सांगते. या मालिकेच्या दरम्यान पुन्‍हा एकदा मला त्यांनी आपल्या घरी बोलवलं आणि पुन्‍हा माझ्यावर बलात्‍कार केला. त्यानंतर मी मालिकेच्या कोणत्याच निर्मितीत थांबले नाही बाहेर पडले पण एका विषण्ण आवस्‍थेत गेले. 

या पोस्‍टच्या अखेरच्या भागात विंता कुणाबद्दल लिहिते हे स्‍पष्ट होते. अलोक नाथ यांच्याविषयीच ती बोलतेय हे कळून येते. इथे ती लिहिते की विरोधाभास हा आहे की, ज्या दरिंद्याबद्दल मी बोलते आहे तो मोठा कलाकार आहे आणि त्याला सिनेमा आणि टीव्‍ही या सिनेजगतात सगळ्यात मोठा संस्‍कारी अभिनेता म्‍हणून मानलं जात आहे. 

स्‍वैर अनुवाद : महादवे पार्वती रामचंद्र

तेव्‍हाची 'ती' आता बदलते माझ्या मनात

लहान होतो. नववी दहावीत असेन. आमच्या गावाकडं थिएटर नव्‍हतं. एक मोठं हॉटेल सुरू झालं आणि त्याच्या मागे एक मोठा हॉल होता. त्यात प्रोजेक्‍टरवर पिक्‍चर दाखवत. नववी दहावीत असताना मे महिन्याची सुट्टी लागल्यावर आम्‍ही मित्रांनी त्या आमच्या थिएटरात पिक्‍चर बघायचा ठरला. आता नीटसं त्या सिनेमाचं नाव आठवत नाही पण रेखाचा तो सिनेमा होता. त्यात तिच्या नवर्‍यासमोरच तिच्यावर काही लोकं अत्याचार करतात. तेव्‍हा आम्‍हाला तिचं वाईट वाटलं नाही पण तो सीन आम्‍ही एन्‍जॉय करत होतो. आम्‍हाल त्यातून एक असूरी आनंद मिळत होता. रेखाला अर्धनग्न आवस्‍थेत बघताना कोणता आनंद व्‍हायचा ते तेव्‍हा सांगता आलं नाही पण आता सांगता येईल. पण आता त्याचं वाईट वाटतं. आयुष्यातील थिएटरात जाऊन मी पाहिलेला तो पहिला सिनेमा. मग आमच्या छोट्या मोठ्या दोस्‍तांच्यात त्या पिक्‍चरची चर्चा सुरू झाली. त्यात काय बघण्यासारखं आहे हे आम्‍ही एक नाही दहा पद्धतीनं सांगत होतो. त्यावेळी या गोष्टीचं काय वाटलं नाही पण आता लाज वाटते, शरम वाटते त्या दिवसांची. लाज, शरम वाटत असली तरी त्या काळापासून आता मी खूप लांब आलोय.

ते दिवस आठवण्याचं कारण म्‍हणजे आता सिनेमातील अभिनेत्रींवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारांची चर्चा. नंतर नंतर चित्रपट बघण्याचं वेड लागलं ते काही सुटलं नाही. सुरूच आहे. मग पत्रकारिता करताना सिनेमाच अभ्यासाला घेतला. सिनेमाविषयी वाचन चालू केलं. वाचत राहिलो. समजून घेत राहिलो. सिनेमाविषयी गंभीर, खोलात जाऊन विचारी करणारी माणसं भेटली. बोलणारी आणि चर्चा करणार्‍या माणसांबद्दल सिनेमाकडे बघण्याची एक नजर मिळाली. सिनेमाकडेच नाही तर अखंड माणूसपणाकडं विविध नजरेनं कसं बघता येईल हे सिनेमांमुळेच कळालं.
गावाकडच्या त्या हॉलच्या थिएटरात सिनेमा बघून आलं की, आमच्यापेक्षा मोठी असणारी पोरं अभिनेत्रींविषयी काहीही सांगायची. ते आता कळतं. ती पोरं सांगायची सिनेमात काम करणार्‍या बायका चांगल्या नसत्यात, त्यांना घर-दार नसतं, त्या अनाथ असतात, त्या तसल्याच असतात, पैशासाठी कायबी करतात, त्यांची लग्नं होत नाहीत,  पिक्‍चरात येण्यासाठी आधी त्या कसबी शूटींग करायला लावत्यात, नंतर त्या तसं करत नाहीत, बलात्‍कार, अत्‍याचार, इन्‍टीमेट सीन करताना त्या बनवट शुटींग करायला लावतात, असं ती पोरं काहीही  सांगायची. त्यांच्या सांगण्याचा या ना त्या कारणांनी माझ्यावर विपरित परिणाम होते गेला. बाई या माणूस असणार्‍या गोष्टीकडे बघण्याची नजर बदलली. बाई म्‍हणजे काय?...असं खूप तुच्छतेनं मनात यायचं. ती तुच्छतेची नजर अगदी कळत्या न कळत्या वयापर्यंत माझ्यात होती असं आता मला वाटतं. आमच्या गावात नाटक असलं की शहरातून नटी यायची. ती देवळात नाही तर शाळेत उतरायची. गावाकडची फार कमी माणसं त्या नटीला घरात बोलावायची. कारण नटी म्‍हणजे ती तसलीच असणार असच गावाकडच्या लोकांना वाटायचं. पण आता कळतं तसं काही नसतं. सगळे आपापले चष्म्यातून बघत असतात, आपण लावू ते आपल्याला दिसणार, अन्‌ दिसत राहणार.
आता तनुश्रीनं लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवला आहे. तो आवाज आता उठवला असला तरी कित्‍येक दशकं तसाच तो दाबूनच ठेवला होता की. आत तनुश्रीचं समर्थन आणि नाना पाटेकरला विरोध असं मनात नसलं तरी स्‍त्री म्‍हणून होणारी तिची कुंछबना तनुश्रीच्या आवस्‍थेपेक्षा वाईट आहे. तसं म्‍हटलं तर घरातल्या आईशिवाय आपण कुणाचा आदर करतो आणि एका विशिष्ट टप्‍प्यानंतर आईलाही मग बोलायला मग जराही कचरत नाही आणि मागे हटत नाही. तिचं माणूस असणं हेच मुळात आपणाला पटणारं नसतं.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कुणाला ना कुणाला बाई विविध अर्थानं भेटते. कधी आपली आई, कधी बहीण, कधी आजी, कधी मैत्रीण, कधी प्रियेसी, कधी बायको, कधी सहकारी तर कधी फक्‍त हायबाय करण्यापुरती ओळख. अशा विविध नात्यात ती विभागली गेली असली तरी तिची विवंचना ही विविध अर्थानं वेगळी असते. ती कधी कुणाला समजते, कधी कुणाला समजत नाही. तसा विचार केला तर बाई म्‍हणून किती पातळीवर तिला संघर्ष करावा लागत असेल. बाई म्‍हणून जन्‍म असेल, नंतर नकोशी असतानाही घरात वावर असेल, घर झालं की शाळा, समाज आला, शाळेतही मग अनेकार्थनं कुंछबना, कधी हुशार नाही म्‍हणून तर कधी पारंपरिक सौंदर्यशास्‍त्रााचे निकषात बसत नाही म्‍हणून, तिच्या आयुष्यात हे निरंतर चालूच रहातं. आधी मुलगी, नंतर विद्यार्थिनी, नंतर कधी कुणाीची मैत्रीण, नंतर प्रियेसी म्‍हणून, नंतर बायको, नंतर सून, नंतर आई आणि नंतर सासू आणि नंतर म्‍हातारपण या सगळ्यात ती आयुष्यभर दबून जाते. सोसत रहाते तरीही जगत रहाते. तिच्या स्‍वाभिमानानंन कधी मग डोकं वर काढलच तर मग मृत्‍यू आहेच. तिची वाट बघतच बसलेला असतो तो. एक दोन दिवस संबंधितांना त्रास होता (दाखवण्यापुरता) आणि मग रुटीन लाईप चालू होतं. हे असच चालू रहाणार असं म्‍हणत पुन्‍ही ये रे माझ्या मागल्या म्‍हणत. आपण तिला विसरून जगणं सुरू करतो.

तनुश्रीनं आवाज उठवल्यावर दोन्हीकडे गटतट पडले. पण कुणी तनू तुझं बरोबर आहे. तिचं ऐकून घ्या असं कुणीही म्‍हटलं नाही. भलं तिचं चुकतही असेल पण तिच्याकडं दुर्लक्ष करण्यासारखंही नाही. आज तनुश्री, कंगना आणि अनेक महिला बोलताहेत त्यांच्यावरच्या अन्यायाचं. चांगल्या वाईट प्रतिक्रीया व्‍यक्‍त होत आहेत त्या व्‍हाव्‍यातही पण आपण एकच भान ठेवलं पाहिजे की तीही माणूस आहे. प्रत्येकासारख्याच तिला भावना आहेत, स्‍वाभिमान आहे, तिला मन आहे, तिला शरीर, तिच्या गरजा आहेत आणि महत्‍वाचं म्‍हणजे तिचं म्‍हणून स्‍वतंत्र असं समाजात स्‍थान आहे. तिचं ते स्‍थान आपण निर्विदपणे तिला मिळवून दिलं पाहिजे. हे बंद होणार की नाही माहिती नाही पण तिचं हलाखीचं आणि वेदनेचं अखंड जगणं अविरत सुरूच रहाणार आहे म्‍हणून हा शब्दप्रपंचही मी अर्ध्यातच सोडून देतोय...

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...