देव डी, दॅट गर्ल ईन यलो बुट्स, जिंदगी ना मिलेगी दोबारा अशा विविध धाटणीच्या चित्रपटात काम करणारी कल्की कोचलीन अनेक गोष्टीमुळे चर्चेत राहत असते, आणि तिची चर्चाही मग नेमक्या त्या वर्मावर बोट ठेवते. ती म्हणते विवाहानंतर अनुराग कश्यपचीच पत्नी म्हणून मला लोकं मला ओळखू लागली पण अनुरागला कधी, कुणी कल्कीचा नवरा म्हटलेलं मला आठवत नाही. ती गोष्ट माझ्यासाठी वेदनादायीच होती. कित्येक काळ ती वेदना माझ्या मनात सलत राहिली आहे.
समांतर, प्रायोगिक अशा चित्रपटातून काम करणारी कल्की तिच्या बिनधास्त वागण्यामुळे लोकांच्यात चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. विवाहसंस्थेविषयी तिची काही स्पष्ट आणि परखड मतं आहेत. देशातील विवाहसंस्थेमुळे येथील महिला अबला आणि कमजोर बनल्याचे स्पष्टपणे ती मांडते.
शैली चोपडा आणि मेघना पंत यांनी लिहिलेल्या फेमनिस्ट राणी या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ती बोलत होती. ती म्हणते स्त्रिच्या विवाहानंतर तिच्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत असतात. त्यातील महत्वाची अडचण असते तिचे हक्क. कल्की आणि अनुराग कश्यप यांनी २०११ मध्ये विवाह केला. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला. २०१५ पासून ती दोघं स्वतंत्र झाली.
लग्नानंतर तिच्या आयुष्यात झालेल्या बदलाबद्दल ती म्हणते अनुरागबरोबर लग्न झालं तेव्हा कार्यक्रमासाठी अनुरागबरोबर मलाही कार्यक्रमाला बोलवलं जायचं. तेव्हा माझी ओळख ही अनुरागची पत्नी अशीच करून दिली जायची, पण कधीही हा कल्कीचा नवरा अशी ओळख कुणी करून दिली नाही.
ती म्हणते विवाहनंतर येथील विवाहसंस्था महिलांना कमजोर बनवतात. म्हणजे नवर्याने तिला स्वतंत्र दिलं तरी आणि नाही दिलं तरी ती कमजोरच असते. कारण भारतातील विवाहसंस्थांची निर्मितीच अशा गोष्टींवर तयार केली आहे. प्रत्येक नात्यात इमानदारी आणि स्वतंत्रता गरजेची असली तरी येथील महिलांवर बंधनं ही येतातच. मात्र माझा घटस्फोट झाल्यानंतर मला हवं तसं मी माझं आयुष्य जगले.
अनुराग कश्यपबरोबर घटस्फोट झाल्यानंतर ती म्हणते, माझ्या आयुष्यातील महत्वाचा काळ मी एकांतात घालवला आहे. रितं झालेलं आयुष्य भरून काढायचं होतं. हे रितेपण प्रचंड अस्वस्थदायी असलं तरी त्याला मी दारू आणि माणसांच्या गर्दीत घालवलं नाही. त्यापासून लांब गेले आणि अंर्तमुखतेला जवळ केलं. अंर्तमुख होऊनच मग कुटुंबातील प्रत्येकाशी माझं वेगळं नातं मी निर्माण केलं. माझ्या माणसांच्यासोबतच मी सगळा वेळ घालवला. हा प्रवास खरचं माझ्यासाठी आनंदी होता, म्हणून मला माझ्या आयुष्यातील हा प्रवास सुखकर आणि आनंदी वाटतो. जगातील प्रत्येक माणूस महत्वाचा आहे आणि प्रत्येक माणूस समान आहे. म्हणून एकमेकांचा सन्मानही महत्वाचा वाटतो मला.
आपण पितृसत्ताक समाजात वाढलो, जगलो म्हणून स्त्रीवादाला पितृसत्ताकाच्या विरोधात वापरले जाते. पण खरा स्त्रीवाद म्हणजे समानता. स्त्रीवादापेक्षा मला समानतावादी हा शब्द महत्वाचा वाटतो आणि समानतावादी हा शब्दच खर्या अर्थाने वापरला पाहिजे. कारण यामध्ये स्त्री पुरूषांसाठी सन्मानाची वागणून देणारा हाच एकमेव शब्द आहे. मार्गरिटा विथ अ स्ट्रॉ, दैट गर्ल इन यलो बूट्स आणि वेटिंग अशा चित्रपटातून पारंपरिक भूमिका केल्या असल्या तरी त्याचा मला तोटा झाला नाही.
माझ्या अनेक चित्रपटातून केलेल्या भुमिकांमुळे लोकांनी मला परंपरावादी अभिनेत्री म्हणून माझ्यावर शिक्का मारला. मात्र ही वेळ माझ्या आयुष्यात फार कमी काळासाठी आहे. त्या काळात नव्या सिनेमासाठी आपण नवं असणं फार महत्वाचं. पारंपरिक प्रतिक्रिया आल्यानंतर त्याच्याही पुढंही जाऊन बघणं आपल्यासाठी महत्वाचं असतं. कारण त्या क्षणानंतर आपल्याला कळतं की, अरे अजून आपलं काम बाकी आहे...आणि त्यासाठीच आपण आहे.
स्वैर अनुवाद : महादेव पार्वती रामचंद्र
Khup sunder anuvad
ReplyDeleteGood translation .
ReplyDelete