Saturday, 25 August 2018

बदललेल्या अभ्यासक्रमाची कार्यशाळा


शहरातील महाविद्यालयाचा परिसर. इमारत पांढरी शुभ्र आणि खिडक्‍या तपकीरी रंगाच्या. महाविद्यालयाचा वातावरण अगदी प्रसन्‍न. कुठं कुठं हिरव्यागार झाडांच्या कुंड्या आणि झाडं. कॉलेज आहे म्‍हटल्यावर तरुणांचा वावर. सळसळत्या तरुणाईचा  इथं वावर आहे हे तिथल्‍या प्रत्येक गोष्टीतून दिसत होतं. कॉलेजमध्ये बदललेल्या अभ्यासक्रमावर कार्यशाळा सुरू आहे. मित्राला हुक्‍की आली कार्यशाळेला बसण्याची. विषयही चांगला, मग बसण्याचाच निर्णय घेतला आणि बसलो. सुरूवातीपासून हजेरी लावता आली नाही मग दुसर्‍या सत्रापासून आमची हजेरी. 

कार्यक्रमाच्या हॉलमध्ये सगळे प्राध्यापकच प्राध्यपक. महिला, पुरूष, तरुण, तरूणी, कायमस्‍वरूपी, तासिका तत्‍वावर राबराबणारे आणि सेवानिवृत्तीकडे झुकलेले अशा माणसांची हॉलपुरती गर्दी.

विद्यापीठाची कार्यशाळा म्‍हटल्यावर मनात खूप गर्दीची अपेक्षा होती. मात्र ती हॉलपुरतीच मर्यादित होती पण विखुरलेली. इतरस्‍त: कार्यक्रम सकाळी सुरू झाला होता असेल. विचारमंच्या समोरील पहिल्या एक दोन रांगा तज्ञांचं मत ऐकत बसलेल्या. ते बघून मन भरुन आलं होतं, तर शेवटाकडं बसलेल्या सगळ्या रांगा कळप-कळप करून गप्‍पांच्या फडात रंगलेले. ते चित्र बघून प्रचंड मन खिन्‍न आणि उदास.
दुपारच्या सत्रानंतर बसल्यानं डिजिटल बोर्डावरचा विषय बघून चर्चेचा सूर लक्षात आला. विचारमंचावरून बोलणारे सगळेच तज्ज्ञ होते. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्‍कृतिक आणि राजकीय अशा एक ना अनेक विषयांना स्‍पर्श करून अभ्यासक्रमातील पुस्‍तकांचं विश्लेषण चाललेलं. पुस्‍तक कोणतंही असो ते माणसांच्या पलिकडचं नसतच बहुधा. असलं तरी मग ते कल्‍पनेच्या जोरावर उभा राहिलं जातं आणि त्याचंही मग त्याचंही विश्लेषण होतं. ते ही विश्लेषण मग तज्ज्ञ प्राध्यापक करतात. भूमिका मांडतात, निकष ठरवतात आणि फायनल एखाद्या गोष्टीवर येऊन थांबतात, आणि कधी कधी थांबतही नाहीत. मग  समाज, माणसं, परिस्‍थिती, काळ अशाही गोष्टींचं मग चिंतन सुरू होतं. ते सुरूच असतं असं सांगितलं जांत.   

 कार्यशाळेत महिला प्राध्यापकही होत्या. हॉलमध्ये एक नीटनेटकापणा जाणवत होता. अनेक सुगंधांचा एकच दरवळ सुटला होता. हॉलमधल्या प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक रिचपणा जाणवत होता आणि तो तीव्रपणे जावणारा होता. वातावरण एकदम सुगंधी. गंधीत करणारं. 

प्राध्यापकांची कार्यशाळा म्‍हटली की तो सुरूवातीपासूनच रिचपणा जावणत राहतो. आजपर्यंत अनेक कार्यशाळा अटेंड केल्या आहेत. का माहित नाही पण प्राध्यापक व्‍हावं असं नेहमीच वाटत राहिलं. जगण्याची सुंदर आणि श्रीमंत जगण्याची हौस असेल तर प्राध्यापक व्‍हावं. पण काही प्राध्यापक अपवाद आहेत आणि असतात. प्राध्यापक, डॉक्‍टर असले तरी त्याचा कुठे बडेजाव नाही, की हुरळून जाणं नाही. सतत अभ्यासात मग्न. प्रत्येकाशी विनम्रमतेची भूमिका. मग समोर येणारा लहान असो की मोठा. वृत्ती तिच. विनम्रतेची. 

प्राध्यपकांच्या आयुष्यातील कार्यशाळा हा भाग फार महत्‍वाचा (असं मानलं जातं). असो. कार्यशाळेत बदलत्या अभ्यासक्रमावर अनेक मान्यवर, अभ्यासक, विचारवंत, तज्ञ, महिला बोलत होत्या. कार्यशाळेत विचारमंचावरनं बोलणं फक्‍त चालू होतं. कोण ऐकत होतं, कोण जाणं. त्‍या कार्यशाळेतील ऐकणार्‍यांवरच चांगलं संशोधन होऊ शकेल एवढा हा विषय गंभीर. गंभीर पण कुणाच्या दृष्टीनं. ते त्यांचं त्यांनी जाणो. 

कार्यशाळेत सत्रं चालू होती. अभ्यासक प्राध्यापकांसाठी, शिकवणार्‍यांसाठी, संशोधकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी. कॉलेजमध्ये असताना आम्‍ही कुणी चुळबूळ केली की, सन्‍मानानं आमचा अपमान व्‍हायचा. वर्गातल्या मुली मग आमच्यापेक्षा डबल चुळबूळ करायाच्या. त्याचच वाईट वाटायचं अन्‌ सरांचा राग यायचा. तो तेवढ्यापुरताच. पुन्‍हा मग वर्गात येऊन बसायचं, मनात अनेक घटना घेऊन सरांचं लेक्‍चर ऐकत बसायचं. अगदी लक्ष देऊन. कुठंही न बघता. 

पण सरांच्या कार्यशाळेत आमच्या पोरांसारखं हे चित्र नव्‍हतं. सरांच्या वर्गातलं चित्रच विचत्र होतं. सगळ्या सरांची गडबड गोंधळ, बडबड, हलचल. परिस्‍थिती अगदी कावळ्याच्या मानेसारखी. सतत इकडे तिकडे फिरणारी आणि खिडकीतून बाहेर डोकावणारी. माझ्या कॉलेजचे दिवस आठवले. सर वर्गात असताना आम्‍ही साधं खिडकीतूनही बघत नव्‍हतो. कारण काय तर सर शिकवतात. सर काय सांगायचे, इतिहास, भूगोल, माणसांचं जगणं, मरणं, देशातल्या विदेशातल्या कहाण्या. आम्‍ही पोरं लक्ष देऊन, दोन्‍ही हातावर हनुवटी ठेऊन सरांच्याकडं बघत ते ऐकत असू. केवढं अप्रूप वाटायचं त्यावेळी. कधी कधी वाटायचं प्राध्यापकच व्‍हायचं आपण. आपल्या सरांसारखं. पोरांना काय काय सांगायचं, कडक इस्‍त्रीत यायचं, दरवळणारा गंधाचा एकादा स्‍प्रे मारावा, पोरांवर दटावणीच्या स्‍वरात रुबाब करायचं असं काय काय वाटायचं. पण हे सगळं काळाच्या ओघात मागं पडलं. कार्यशाळेमुळे पुन्‍हा ते दिवस कसे अगदी सहज डोळ्यासमोरून तरळून गेले. 

कार्यशाळेत सगळेच सर. शिपाईच कोण नाही. सरच सर. कार्यशाळेत बोलणारेही सरच आणि ऐकणारेही सरच. ते चित्र बघून वाटलं आमच्या वर्गात असं नव्‍हतं. वर्गातल्या या सरांसारखं आम्‍ही कुठंबी आणि कसंबी बोलत नव्‍हतो. कळप कळप करून रहात नव्‍हतो. गप्‍पा तर मग माझ्या डोक्यापलिकडच्या. शहरातल्या जागा, बॅण्डेड कपडे, कार, पोरांच्या शाळा, गुंतवणूक कसल्या चर्चा. कार्यशाळा कसली तेच कळत नव्‍हतं. कोण ऐकत होतं तेही समजत नव्‍हतं. बोर्ड आणि निवेदनामुळं तो कार्यक्रम मग कार्यशाळा वाटे एवढचं. बाकी सगळी बसलेल्यांच्यातच चर्चा. तर काही जणांची बाहेर उभा राहून चर्चा. आपल्याच सहकार्याचविषयाची असं डोळ्यांच्या आणि हलचालीवरून वाटायचं. 

कार्यशाळा असलेल्या हॉलबाहेबर पुस्‍तकांचे स्‍टॉलही लागलेले. मोठ्या टेबलवर पुस्‍तकांची मांडामांड. गर्दीच्या मानानं पुस्‍तकांच्या स्‍टॉलवरही गर्दी तुरळकच. तीही चहा पिण्यासाठी चहा पिता पिता कुठलं तरी पुस्‍तक हातात घेऊन चाळणं याच्यापलिकडं काही नव्‍हतं. कोणतरी घेत असलं की कोणत तरी म्‍हणायचं अहो आपल्या कॉलेजमध्ये आहे की हे पुस्‍तक कशाला उगाच घेता. ते मग आहे होय?...म्‍हणत कुठल्यातरी विषयावर येऊन थांबायचे आणि म्‍हणायचे आणि किती वेळ चालेल असं विचारत त्याला एक जोडून प्रश्न असायचा प्रमाणपत्रं कधी वाटणार आहेत...मग कावळ्यासारखी मान चारीकडं फिरवून कोण वाटणार याचा शोध घेत. कोण कोण म्‍हणत कुणाकडं बोट जायचं आणि मानेनं खूण करून प्रमाणपत्रांची माहिती घेत बाहेर सगळे थांबलेले असायचे आणि सगळ्यांचं लक्ष हातातल्या घड्याळ्यकडं असायचं. 

कार्यशाळेत याच्यापेक्षा वेगळं चित्र नव्‍हतं. पुढं कायतरी कुणीतरी काय तरी सांगतं आणि खाली प्राध्यापकांनी आपापला मेळा बसवलाय. चार-पाच, चार-पाच जण मिळून हळू आवाजात गप्‍पांचा फड रंगवलाय. प्राध्यापकांच्यातील विषयही भन्‍नाट. काही जण हळू आवाजात तर काही जण मंचावरला वक्‍त्‍याला लाजवेल एवढा मोठा आवाज. त्‍यात तासिका तत्‍वावर असलेल्या अश्वासक प्राध्यापकांची अडचणच वेगळी. हेड आहेत म्‍हटल्यावर दिवसभर कान देऊन ऐकत बसलेले आशावादी प्राध्यापक. शांत, मलूल आणि आशावादी. ऐकत असणारे आणि पुस्‍तकं चाळणारे, वाचणारी पोरच पण होऊ घातलेले प्राध्यापक. परिस्‍थितीनं नको इतकी समज आणलेली मग अभ्यासात या पुढचा वापर. कोण काय लिहितं आणि कोण काय वाचतं ते या तासिका तत्‍वावरच्या प्राध्यापकांना तोंडपाठच. 

अवस्‍था वाईटय ते कळत नव्‍हतं. पण वाटत होतं. आपण कसं बोलणार. आपण ना प्राध्यापक, ना डॉक्‍टर, ना नेट-सेट ना काय. पण काय तरी विचित्रच आहे हे उगाच वाटत राहिलं आणि बसलेल्या प्राध्यापकांमध्ये चहावालं पोरगं  आलं सुरके पिओ म्‍हणत सार्‍या कार्यशाळेवर सगळ्या सरांनी जाण्याचा सूर ओढला आणि एक एक करून बाहेर पडले...प्रमाणपत्र वाटणार्‍याच्या शोधात.

Saturday, 18 August 2018

बेन्‍नुर सर भेटायचं राहून गेलं....



फकरुद्दीन बेन्‍नुर...कॉलेजमध्ये असताना कधीतरी त्यांचे लेख वाचत होतो. का कुणास ठाऊक पण त्या दिवसांपासून उगाच मला वाटायचं यांना भेटलं पाहिजे. कदाचित आता असं वाटतं हमीद दलवाईंच्या इंधन कांदबरीमुळे मला उगाच त्यांच्याबद्दल अप्रुप वाटायचं. ते अधिक चांगलं सांगितील असंही नेहमी वाटत राहिलं. परिवर्तनाचा वाटसरूमध्ये त्यांचे लेख यायचे तेव्‍हा मग परिवर्तनाचा मी नेहमीचा वाचक झालो. त्यांच्या लेखासाठी मी ते मासिक घेत होतो. बाकीचेही लेख अभ्यासपूर्ण असायचेच. पण बन्‍नुर सरांचे लेख विशेष आवडायचे. कोल्‍हापुरात एकदा दोनदा आले होते, तेव्‍हा मला तीव्रपणे भेटायची इच्छा झाली, पण त्यांच्याजवळच्या गर्दीनं ते शक्‍य झालं नाही. पण त्‍यांचे कुठं कुठं छापून आलेलं वाचत राहिलो. भारतीय मुसलमानांची समाजरचना आणि मानसिकता हे त्यांचं वाचलेलं पुस्‍तक. वाचून झाल्यावर त्यांना पत्र लिहून कळवावं असं वाटलं पण ते आळसामुळं झालं नाही. 

त्यांच्यामुळं मग सोलापुरविषयी आपुलकी वाटायची. सोलापुरचं कोण भेटलं की आनंद व्‍हायचा आणि त्याला मग माझा प्रश्न असायचा फकरुद्दीन बेन्‍नुर सरांना कधी भेटलाय की नाही...मग ते म्‍हणायचे ऐकलय, वाचालय त्यांचं, तेव्‍हा मला भारी वाटायचं. त्यांना प्रत्येकानं वाचलं पाहिजे असंही वाटत रहायचं आणि आता तर ते तीव्रपणे वाटू लागलंय. 

गेल्‍या वर्षी सांगलीत असताना ते एकदा एका कार्यक्रमाला आले होते, प्रसादाला सांगितल्यावर तो घेऊनही गेला. त्यावेळी रात्रीचे आठ साडे आठ वाजले होते. ते ज्या हॉटेलमध्ये उतरले होते तिथेच मग प्रसाद घेऊन गेला. जेवत होते, शांतपणे समोर बसलेल्यांना काहीतरी सांगत होते. त्याही गर्दीतही मग भेटायचं राहून गेलं. पण मग आम्‍ही त्यांच्यासमोरच जेवायला बसलो. जेवणानंतर तरी भेटायचं ठरवलं पण शेवटपर्यंत गर्दी काय कमी झाली नाही...आणि भेटायची इच्छाही पूर्ण झाली नाही...


बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...