तसं मला नाटक आवडतं. लहान असताना गावात नाटक व्हायचं. नंतर दादा आमचा एकांकिका, नाटक करू लागला. तेव्हापासून ते आणखी आवडू लागलं. काल गावात दशावतारी नाटक झालं. माझ्या मित्राच्या गावातील नाट्य मंडळी होती म्हणून मी ते नाटक आवडीनं रात्रभर पहात बसलो. अगदी त्यांच्या मेकअपपासून ते कथानकाच्या शेवटापर्यंत पहात बसलो. या नाटकात माझा मित्र नारायण काम करतो असं उगाच वाटे. नारायण, विठ्ठल, एकनाथ ही माझी दोस्त मंडळी अजून नाटकात काम करतात. कालचे नाटक करणारेही त्यांच्याच वर्गातले. आगेमागे असणारे. . म्हणून मग पाहत बसलो. आवडू लागलं तसं त्यांच्याच मेकअप रूममध्ये जाऊन बसलो. नारायणची ओळख सांगितल्यावर ते आणखी खुलले. मला बारकावे सांगत, संदर्भ देऊ लागले. मग भारी वाटू लागलं.
म्हणजे दशावतार सादर करणारी सगळी मंडळी म्हणजे माझी पिढी. प्रथम सादर होणार्या गणपतीस्तवनापासून मग सुमधुर, ऋद्धी, सिद्धी, सरस्वती, ब्रह्मदेव आणि संकासुर यांच्या प्रवेशापर्यंत दशावतार मला बेहद्द आवडतं. संकासूराच्या प्रवेशानंतर मुख्यकथानकाला सुरूवात होते तेव्हा गावाकडची नाटक करणारी ही पोरं रंगमंच नसताना, हायफाय कोणत्याही नाटकाच्या सोयीसुविधा नसताना जमिनीवरच आणि एका दुसर्या लाईटच्या प्रकाशात नाटकाचा सुंदर माहोल बनवतात. समोर बसणार्या प्रत्येकाला खेळवून ठेवण्याचं सामर्थ्य ते त्यांचं त्यांनी निर्माण करतात.
काल नाटक सादर होत असताना मला माझ्या मित्रांची आठवण येत राहिली. माझे मित्रही दशावतार करतात याचं नेहमी मला अप्रूप वाटत आलंय. नाट्यगीतं, पौराणिक भाषेतील तो लहेजा तो ते खूप आनंदानं सांभळतात. विनोदी पात्रं, पौराणिक काळातील असली तरी त्याला समकाळातील संदर्भ देत विनोदाची वातावरणनिर्मिती ते करतात. गावाकडची माणसंही त्यांना तेवढ्याच मनमुरादपणे दाद देतात.
नाटक सुरू होण्याआधीपासून त्यांची होणारी तयारी बघण्यातील मजा वेगळी असते. मेकअप करताना तिथे एक गंध पसलेला असतो. तो मोहविणारा असतो. त्यांच्या चेहर्यावर चढणारा रंग बघून आणि पूर्णत्वाकडं जात असलेलं त्यांचं पात्र ते मध्यरात्रीपासून अधिकाधिक खूलत जातं.
नाटक अजून बाकी आहे....(अपूर्ण)

No comments:
Post a Comment