Monday, 17 December 2018

दु:खाची किनार गडद करणारा 'मसान'


बनारसमधील गंगा घाटाच्या किनारी थंडीची किनार आहे, त्या कडकडीत थंडीमध्ये एक मुलगा आपल्या दोस्‍तांसोबत शांत नीरसपणे बसला आहे. जो मुलगा कालपर्यंत जिच्यावर बेहद्द प्रेम करतो, प्रेमात तिचे लाड करतो त्या मुलीचा देह आपल्या हातांनी जाळतो आणि दु:ख विसरण्यासाठी मित्रांसोबत दारू पित शांतपणे बसतो. बरोबरचे मित्र तो बोलावा म्‍हणून प्रयत्‍न करतात तर त्याचाच एक दोस्‍त म्‍हणतो की त्याला थोडा वेळ द्या त्याच्यासाठी.


मित्र म्‍हणतो त्याला आपण थोडा वेळ देऊ त्याचे वाक्‍य संपते न संपते तेवढ्यात तो म्‍हणतो की,उसे शायरी पसंद है. ती शायरी यालाही बेहद्द आवडायची. त्याच्यासाठी ती फोनवरून त्याला ऐकावायचीही. पण आता ती या जगात राहिली नाही. यावेळी ती आगीत जळताना तिच्या देहाचा आवाज येतो. तिची चिता जळत असताना त्या आगीत तो लाल लाल होताना दिसत आहे आणि त्याच्या डोळ्यातून निरंतर अश्रुचा बांध फुटला आहे. त्यावेळी त्याच्यामागून एक ट्रेन जाताना दिसत आहे आणि तो उद्वेगाने म्‍हणतो, “तू किसी रेल सी गुज़रती है, मैं किसी पुल सा थरथराता हूं…”  असं म्‍हणत तो आकाशाकडे कितीतरी वेळ शून्यात नजर लावून पाहत राहतो, आणि सगळं मन एकवटून दोस्‍तांना म्‍हणतो की, “साला ये दुःख काहे ख़तम नहीं होता है बे?”


त्याचं दु:ख तीव्र होत जाते, तो त्याचा आक्रोश सार्‍या नदीघाटावर घुमत राहतो, त्यावेळी त्याचे अनेक दोस्‍त त्याच्याजवळ येतात, त्याला समजवतात, शांत करण्याचा प्रयत्‍न करतात पण तो रडणं थांबवत नाही. तेवढ्यात त्याचा अगदी जवळचा असणार त्याचा मित्र त्याच्याजवळ येतो म्‍हणतो “हम बहुतै मारेंगे. हम…समन्नई रहे हो. बहुत मारेंगे हम तुमको.”

तर एकीकडे देवी पाठक आहे. देवी म्‍हणजे एका पुजर्‍याची मुलगी. एका खासगी क्‍लासला शिकवणारी. एक दिवस आपल्या मित्रासोबत ती ल्रॉजवर जाते, आणि ती दोघं एकाच खोलीत पोलिसांना सापडतात. त्यातून सुटका करून घेण्यासाठी आत्‍महत्या करतो आणि देवीचं आयुष्याला वेगळं वळण लागतं. ज्या पोलिसानं धाड टाकून त्या दोघांना लॉजवर पकडतो तो पोलिस पैशासाठी तगादा लावतो. बाप साधा पुजारी त्याच्याकडे एवढा पैसा नसतो. लॉजवर ज्या स्‍थितीत ते सापडता त्याचं पोलिस शूटींग करतो आणि म्‍हणतो हे जर मी मीडियात दाखवल तर केवढी बेइज्जत होईल. या बेईज्जतील घाबरून देवीचा बाप कुठून कुठून पैसा जमा करून पोलिसाला देतो. त्या सगळ्याचं खापर देवीवर येत. देवी सगळ्याच बाजूनी हतबल होते. एकीकडे मित्र आत्‍महत्या करतो, तर दुसरीकडे बाप, पोलिस टोचणी लावतात. हे सगळं असलं तरी ती प्रयत्‍न करून रेल्‍वेत नोकरी मिळवते आणि आयुष्य स्‍थीरस्‍थावर करण्याचा प्रयत्‍न करते. मित्राच्या प्रेमातून उतराई होण्यासाठी म्‍हणून ती आपली बाजू मांडायला ती मित्राची आई वडीलांना जाऊन भेटते, त्‍यांना सांगताच ते तिला घरातून बाहेर काढतात. हे सगळं ओझं घेऊन ती गंगा नदीच्या अथांग घाटावर शांत, नीरसपणे येऊन बसते.

मसानमध्ये देवी, आणि दीपक यांचं दु:ख समांतर आहे. दोघांचेही आयुष्यातील साथीदार जग सोडून गेलेत. त्यांची पोकळी या दोघांच्या आयुष्यात गंगा नदीच्या अथांग घाटासारखी आहे. यावेळी देवीला एकजण म्‍हणतो की, संगम दो बार आना चाहिए, एक बार अकेले एक बार किसी के साथ! पण आता यांच्या साथीला कुणीच नाही. दोघंही एकांतात येऊन इथे बसतात. देवीला सगळं नकोसं वाटतं, सगळ्यातून उतराई होण्यासाठी म्‍हणून मित्रानं दिलेली अंगठी ती गंगेच्या नदीपात्रात हळूवारपणे सोडते तेव्‍हा मसान म्‍हणजे वाटतं “साला ये दुःख काहे ख़तम नहीं होता है बे?”.

बंद कारखान्याचीही गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली...

आम्ही भावंडं विद्यापीठात शिकत होतो तेव्हा आमचं सगळं बालपण , मोठेपण गेलेल्या त्या कारखान्याला उतरतीची घरघर लागली होती. आबांचा पगार बंद होण्या...