आदरणी महोदया,
काळानुसार समाजाची अवस्था, परिस्थिती माझ्या काळापेक्षा भयानक बदलली आहे. अशा परिस्थितीत आज मी माझ्या मुलाला भिती, संशय आणि गोंधळ अशा विचित्र परिस्थितीत तुमच्या शाळेत आणि तुमच्याकडे स्वाधीन करीत आहे. त्याच्याविषयी आता माझ्या मनात होणारी घालमेल मी तुम्हाला सांगते आहे. यामधील अनेक गोष्टी तुम्हाला अजब वाटतील पण तरीही तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर एक आई म्हणून मी तुमची आयुष्यभर ऋणी राहीन.
माझा मुलगा त्याच्या आयुष्यातील महत्वाची चौदा वर्षे तुमच्या शाळेत घालवणार आहे. माझ्या काळजाचा सहा वर्षाचा एक तो एक निरागस तुकडाच तुम्हाला देत आहे. आता तो काळजाचा छोटा तुकडा असला तरी तुमच्या संस्थेतून शिक्षण घेऊन तो जेव्हा बाहेर पडेल तेव्हा त्याला दाढी मिशी आली असेल. तरीही तो शेवटपर्यंत तुमचा विद्यार्थीच असेल. त्याच्या आवाजातही बदल झालेला असेल. हा त्याच्या आयुष्यातील महत्वाचा आणि खूप मोठा काळ आहे. या एवढ्या मोठ्या कालखंडात त्याला अनेक गोष्टींचे ज्ञान तुम्ही त्याला देऊ शकाल, नाही ते तुम्ही द्यालच.
सायंकाळी कधी तरी तो आणि मी जेव्हा फिरायला जातो, तेव्हा त्याच्या अभ्यासाविषयी मी त्याला पुन्हा पुन्हा अनेक प्रश्न विचारते. तेव्हा तो म्हणतो अग, आई किती बोलतीस तू. आता पुन्हा काय विचारू नको मला. बास कर, पुरे कर हे सगळं. मला कळतय हे त्याला नकोसं आहे, आणि मला मी जेव्हा त्याच्या वयाची होते तेव्हाची मी आठवते मलाच. त्याकाळात मलाही ते नकोच होतं, तरीही मी त्याच्याबाबतीत तेच करत आहे. कारण मला माहित आहे की, त्याला शाळेत जायचं आहे आणि सगळ्या मुलांपेक्षा त्याला चांगले गुण मिळावायचे आहेत, आणि शाळेच्या या रेसमध्ये त्याला टॉपला यायचं आहे. या सगळ्यात त्याला घरांच्याच अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. खरं सांगू का मी आता थोडी खजील आणि नाराज झाली आहे, त्याच्या नको त्या वयात त्याच्याकडून मी खूप मोठ्या अपेक्षा ठेवत आहे, त्याच्यासाठी त्या गरजेच्या नाहीत. शाळेत न जाताही तो काही गोष्टी शिकू शकतो तरीही मला आता असं ही वाटू लागलं आहे की, तो जेव्हा शाळेत जाईल, रमेल तेव्हा त्याला कधी असं वाटू नये की, अरे ! इथे येऊन मी चूक केलीय, फसलो आहे.
त्याच्याविषयी माझी एक छोटीशीच मागणी आहे. लहान मुलांवर कमी वयात अभ्यासाच किंवा इतर कोणताही भार नसावा. त्यांच्या डोक्यात, बुध्दीत अभ्यासाचा रट्टा मारणार्या गोष्टींपेक्षा त्यांना आयुष्यभर उपयोगी पडतील अशा गोष्टी शिकवणे गरजेचं आहे. जसं मुला मुलींना समान पातळीवर मदत करणं, मदतीच्या भावना मग ती कुणालाही असो, आयुष्यातील कोणत्याही नात्यातील मदत असो. त्याच्याकडून कुणालाही सढळ हातानेच मदत केली जावी. मदतीच्या भावनेतूनच मग ते चांगले बहीण-भाऊ, चांगले मित्र-मैत्रिणी, समजूत प्रियकर-प्रेयसी, चांगले पती-पत्नी आणि चांगले आई-वडील बनतील. या अशा गोष्टीमुळे समाजालाच एक चांगली गोष्ट मिळेल आणि चांगला माणूस मिळेल. त्याला शाळेत कॉम्प्युटर शिकवले जाईल, पण त्याला कॉम्प्युटर आणि मोबाईल ज्या गोष्टी शिकवणार नाही त्याही त्याला शिकवा. एकमेंकांच्या विश्वासाला पात्र कसं असावं, कुणाला तरी दिलेलं वचन किती महत्वाचं आणि ते कसं पाळलं जाईल हेही शिकावा. कॉम्प्यूटर त्याला या गोष्टी कधीच शिकवणार नाही. ज्येष्ठांना मदत करण्याची भावना त्याच्या मनात कायम शाळेच्या दिवसातच निर्माण करा. दलित, वंचित आणि अपंग माणसांची चेष्टा न करण्याचे धडेही त्याला तुमच्या शाळेतच त्याला मिळू देत.
माझं मत एवढंच आहे की, मुलांवर कमी वयात नको इतका भार नको आहे. त्यांच्या मनात, बुद्धीमध्ये अशा गोष्टी द्या की त्या त्यांच्या आयुष्यभर गरजेला पडतील, आणि सोबत राहतील. रट्टा मारणार्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात मोठ्यांनी आणूच नये. शाळेत मित्रांना जशी मदत करता येते तशीच मदत मैत्रीणींनाही करता येते हे देखील त्याला शिकवणं गरजेचं आहे. यातूनच त्याच्या मदतीची भावना वाढीस लागले. ती मदत मग माणसांच्या कोणत्याही नात्यातील असेल. यातूनच मग तो चांगला भाऊ, चांगली बहीण, चांगला दोस्त, चांगला प्रियकर, चांगली प्रेयसी, चांगली पती पत्नी आणि चांगले आई वडील बनेल. यातूनच मग एका चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकेल.
तुमच्या शाळेत त्याल नेहमी खरे बोलावे हे शिकवण्यापेक्षा त्याला सत्याचा स्वीकार करायला शिकवा. तुम्हाला माहितीच आहे की बालपणी नेहमी खरं बोलावे हेच शिकवले जाते, मात्र समाजात एका बाजूला खूप मोठी खोटी दुनिया उभा राहिली आहे. तिथे खरं कुणीच बोलत नाही, कारण तिथे सत्य स्विकारणे आणि ते पचवणे हे कुणालाच येत नाही, जमत नाही. खरं ऐकल्यानंतर आपण सारेच अस्वस्थ होतो, मग खरं बोलून कशाला आफत ओढवून घेईल स्वत:वर. आता माझ्या मुलाला खरं बोलण्यापुरताच त्याला मर्यादित ठेवा. सत्य ऐकण्याची ताकद त्याला तुमच्याच शाळेत मिळू देत. कारण उद्या जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्याच्या मागून येणार्या नव्या पिढीचं खरं त्यांनं ऐकून घेतलं पाहिजे, आणि काही गोष्टी त्यानंही सहन केल्या पाहिजेत. ही सवय आतापासूनच त्याच्या अंगवळणी पाडा. कारण माझ्या मुलाला शाळेत शिकणं म्हणजे उद्याची तयारी असच वाटतं. मी काय सांगते ते ऐकताय ना तुम्ही.
माझ्या मुलाला तुमच्या शाळेत महत्वाचं म्हणजे हे शिकवा की तो मुलगा म्हणजे पुरूष आहे म्हणजे तो काही तरी खास आणि विशेष नाही. त्याला हे समजून सांगा की मुलगा होणं तेव्हा विशेष आहे की घरात आणि बाहेर समाजात वावरताना तुम्ही कोणतंही काम करताना लाजत नाही किंवा नाराज होत नाही. तुम्ही कोणतंही काम करताना सहज तयार होता अन् कोणतंही काम करता.
खासकरून त्याला हे सांगा आपल्या आईपासून खूप काही शिकण्यासारखं असतं. तुझी आई घर आणि ऑफिसची जबाबदारी तारेवरची कसरत करून कशी सांभाळते. दोन्ही कामात ती आपलं शंभर टक्के योगदान देत असते तरीही ती सगळीकडे आनंदीच असते, आणि रहाते. आणि त्याला घरकाम करणार्या अनेक आयाबायांचाही आदर करायला शिकवा. त्यांच्या अपार मेहनतीची त्याला कल्पना द्या. घरकाम करणार्या आईची ओळख त्याने माझी आई काहीच करीत नाही अशी कधीच करून देऊ नये ही शिकवण त्याल पहिल्यापासूनच द्या.
माझ्या लेकाला तुमच्या शाळेत आधी शाळेत येणार्या तमाम मुलींचा आदर करायला शिकवा. त्याला हे शिकवा की मुली अथवा स्त्री म्हणजे जीवंत माणूस आहे. या गोष्टीपेक्षा अनेक गोष्टी तुम्ही त्याल शिकवाल, पण ही गोष्ट त्याच्यासाठी, माझ्यासाठी आणि समाजासाठी महत्वाचं आहे. कारण समाजातील मुलींच्या स्वातंत्र्यावर आणि त्यांच्या अस्तित्वावरच अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
माझ्या काळजाचा तुकडा असणारा माझ्या मुलाच्या निर्णय क्षमतेवर तुम्ही जास्त विचार कराल अशी अशा आहे, कारण नंतरच्या आयुष्यात याच तुमच्या शिक्षणावर महत्वाचे निर्णय घेईल. त्याला मुलींकडूनच निर्णय घेण्याचे धडेही द्या, मुलींच्या निर्णयामध्ये दुसर्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकण्याच्या आणि त्यावर निर्णय घेण्याची क्षमता अधिक असते. मग तो निर्णय कोणताही असो निर्णय घेताना तो आत्मविश्वासानेच घेईल. मुलांना हे ही सांगा की , मुलांचे निर्णय अधिक महत्वाचे आहेत आणि मुलींचे निर्णय कमी महत्वाचे आहेत, ही अतिशय चुकीची संकल्पना आहे! किंवा मुलांचे निर्णय बहुतेकदा योग्य असतात आणि मुलींचे निर्णय बहुधा चुकीचे असतात, ही एक पूर्णपणे चुकीची कल्पना आहे.
यावेळी आपल्या शाळेतील छोट्या मुलींना सांगा की तुम्ही मुली आहात म्हणजे दुय्यम आणि मुलांपेक्षा कमी नाही. जन्मत:च त्यांच्या मनात असणार्या अपराधी भावनेलाच तुम्ही खुडून टाका. त्या छोट्या कळ्यांना हेही कळू देत की तुमच्या कोणत्याही चुकीला तुम्ही स्वत:ला जबाबदार धरू नका. ती जगण्यातील नकारात्मकतेची मोठी भावना आहे, जी त्यांच्या जगण्याची ऊर्जा नष्ठ करणारी आहे.
लहान मुलांकडून त्यांना झेपतील तेवढे शारीरिक कष्ट करून घ्या. कारण मी पाहतेय येणारी नवी पिढी मागच्या पिढीपेक्षा कमजोर आहे. जुन्या पिढीपेक्षा ती श्रम कमी करते आणि ती लवकर थकते. एकंदरीत मुलं निरोगी आणि शक्तिशाली होण्यासाठी कठोर परिश्रम करणं गरजेचं आहे. आपण दररोज सकाळी कुठंही एक चित्र पाहू शकतो की, मुलं शाळेची बॅगही नीट उचलत नाहीत आणि त्यांना उचलताही येत नाही, मग त्या मुलाची आईच त्याचं दफ्तर खांद्यावर घेते, पण आजच्या त्या आईला हे कळत नाही की ती आपल्या मुलाला ती दुर्बल बनवत आहे.
आणि त्याच्या जीवनात त्याला एक महत्वाची गोष्ट सांगा, तो प्रत्येक गोष्ट आदराने घेईल आणि शिकेल. त्याला हे सांगा की फक्त त्याच्या आई वडीलांमुळेच फक्त जीवंत नाही तर समाजातील अनेक घटक त्याच्याशी जोडले गेले आहेत. मुलांना सांगा ते चांगलं आणि सुखी आयुष्य फक्त त्यांच्या आई वडीलांकडे पैसे जास्त आहेत म्हणून सुखी होऊ शकत नाही. तर त्यांना सांगा त्यांच्या प्रत्येक गरजेसाठी, सुखासाठी जगातील अनेक लोक दिवसरात्र काम करीत आहेत, आणि त्यांचं आयुष्य सुखी आणि आनंदी करीत आहेत. तुम्ही माझ्या आणि शाळेतील तमात मुलांना दृश आणि आदृश्य स्वरूपात रात्रं दिवस कष्ट करणार्या लाखो हातांचा आदर करायला शिकवा, कारण ते कधीपासून कामा करण्यात मग्न आहेत.
माझ्या मुलाला हे शिकवा की जिकणं चांगलचं आहे पण हरणं हे ही काही वाईट नाही. वर्गात पहिला, दुसरा आणि तिसर्या नंबरने पास होणे चांगलेच आहे पण वर्गात पाठीमागं राहणं हे ही चांगलच आहे. शाळेच्या दिवसात त्याच्यासाठी कोणती वाईट गोष्ट वाईट असेल तर ती त्याच्या मनात चांगला माणूस न बनण्याची इच्छा.
त्याला सांगा की या जगात डॉक्टर, इंजीनियर, वकील, आयएएस, उद्योगपती आणि व्यापारी बनने अवघड आहे, पण त्याही पेक्षा अवघड चांगला माणूस बननं, आणि चांगला माणूस कायम बनून राहणं अवघड आहे. हे त्याला सांगा. म्हणून कोणत्याही पदापेक्षा आधी त्याला चांगल्या माणूस बनवा हिच माझी अपेक्षा आहे.
सध्याच्या जगात डॉक्टर, इंजीनियर, प्राध्यापकांची फौज आहे, तरीही चांगल्या माणसांचा समाज बनत नाही. याला कारणही आपणच आहोत. आम्ही मुलांना घर, शाळा आणि कॉलेजमध्ये फक्त चांगल्या प्रोफशनलची गोष्ट सांगतो. कुणालाही आपण एका शब्दानही चांगला माणूस बनण्याची गोष्ट सांगत नाही. एका चांगल्या समाजनिर्मितीसाठी चांगल्या प्रोफशनली गरज नाही तर चांगल्या माणसांची गरज आहे.
माझ्या मुलाला जाती, धर्म, पंथ, आणि वंशापेक्षा सर्वाधिक प्रेमाची शिकवण द्या. मला वाटतं की मुलांनी फक्त आपल्याच घरातील माणसांचा आदर आणि प्रेम करू नये. त्यांना फक्त आपल्याच धर्मातील, आपल्याच पंथातील माणसांवर प्रेम करायला शिकवू नका. प्रत्येक ज्येष्ठ माणसांचा आदर करायला त्याला शिकवा. त्यांना ज्येष्ठांना आदर करायला नक्की शिकवा पण त्यांना त्या पात्रतेचे ते आहेत का हे ही समजून सांगा. जर कुणी चुका करीत असेल तो आदरास पात्र नाही पण त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करून तो माणूस स्विकारा हे आवर्जून सांगा त्याला.
मुलांना हे सांगायला हवे की त्यांच्या फक्त कुटुंबाच्या आनंदामुळे कुणी सुखी होऊ शकत नाही. त्यांना असं सांगा की इतरांचं दुःखं, भीती, दुर्गुण, त्यांच्यापर्यंत आपण पोहचलो नाही तर त्याच वाईट प्रकारे आपल्यापर्यंत पोहचतील, आणि त्याचा परिणाम वाईट होईल म्हणून कुणाच्या दु:खाकडे दुर्लक्ष करू नको असं सांगा त्याला.
मला कधी कधी वाटतं त्याला वर्ग, बेंच, खडू, गृहपाठ, परीक्षा, निकाल या जगापासून त्याल दूर घेऊन जा. आपण त्याला नदी, पर्वत, डोंगर, समुद्र, जंगलाच्या सानिध्यात घेऊन जा. या सगळ्या गोष्टींची त्याच्या आयुष्यातील किंमत समजून सांगा. त्याला सांगा, हे जाणवू द्या त्याच्या आई वडीलांपेक्षा याच गोष्टी तुझी कशी काळजी घेतात ते. तो कदाचित आई वडीलांशिवाय तो जिवंत राहू शकेल पण या गोष्टींशिवाय तो कधीच जिवंत राहू शकणार नाही. शाळेच्या दिवसातच त्याला पहिल्या पावसाचा सुगंध घ्यायला शिकवा, कारण पहिल्या पावचाचा पहिला सुगंध त्याच्या आयुष्यभर स्मरणात राहिल.
आपले आई, वडील, त्याच्या दोस्तांवर तो जसं प्रेम करतो तसच प्रेम त्याला या निसर्गावर करायला शिकवा. एकाद्या जंगलाला आग लागली तर त्याला आतीव दु:ख झालं पाहिजे, आपल्याच रक्तातील एकाद्याचं मृत्यू झाल्याचं दु:ख त्याला झालं पाहिजे. दुषित नदीचं पाणी बघून त्याला आपल्यातीलच कुणीतरी गंभीर आजारी असल्याची जाणीव त्याला झाली पाहिजे. त्याला फक्त समस्या आणि अडचणीच दिसता कामा नये तर त्यावर त्यानं उपायही शोधले पाहिजे.
मी एका आव्हानात्मक अशा काळात माझ्या मुलाला तुमच्या स्वाधीन करीत आहे. त्याच्या समोर पुस्तकं, अभ्यास, चांगले गुण आणि चांगल्या शिक्षणापेक्षा अनेक आव्हानं त्याच्यासमोर आहेत. चांगले गुण मिळवणार्या, चांगली ग्रेड मिळवणार्या आणि चांगलं पॅकेज घेणार्यांनाही जगातल्या अनेक आव्हानांशी सामना करावा लागतो, अगदी सामान्य गुण मिळवणार्या मुलांसारखेच त्यांचीही धडपड असते.
वाढत्या शिक्षणाबरोबरच असहिष्णुता, असंवेदनशीलता, सांप्रदायिकता, महिलांवर होणारा अन्याय, लैंगित शोषण, दहशतवाद, हवा, पाणी, वाढणारे प्रदूषण, जंगलांचं कमी होणारं प्रमाण, वातावरणात झालेला बदल, भूकबळी अशा घटना वाढत असताना मूठभर लोकांसाठी मात्र अनेकजण मुलभूत सुविधांपासून वंचित रहात आहेत, आणि यांच्याशीच आजच्या मुलांना संघर्ष करावा लागणार आहे. आणि हिच खरी जीवनाची परीक्षा आहे, ही परीक्षा असली तरी यासाठी कुणीही तयारी करताना दिसत नाहीत. माझं आता एक दु:ख खूप मोठं आहे, की जगात अशी कोणतीच शाळा नसेल जिथं या गोष्टी खूप काळजीपूर्वक शिकवल्या जात असतील.
माझ्या मुलाबरोबरच शाळेतील आणि जगातील मुलांसाठी मी एकच गोष्ट मागेन येणार्या अवघड काळाच्या आव्हानांसाठी त्यांनी तयार रहावं. त्यांच्या शाळेच्या दिवसात असं होऊ नये की त्यांना शाळेच्या अभ्यासातून वास्तव जीवनातील संकटांशी, आव्हानांची ओळखच होऊ नये. त्यांच्या शाळेच्या या काळात त्यांचा मेंदू बुध्दीमान आणि तजेल होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मुलांच्या आयुष्यातील हा तसा आव्हानाचाच काळ आहे. ते शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीच्या शोधात निघतील, पण चांगल्या नोकरीपेक्षा आता त्यांच्यासमोर चांगलं बनण्यासाठी मोठी आव्हानंही आहेत.
क्षमाशीलतेसाठी मुलांना आपल्या चुका कळल्या पाहिजेत आणि माफीसाठीही त्यांच्या धैर्य आलं पाहिजे. माझ्या मुलासह सर्वच मुलांना दगडासारखं मजबूत आणि पाण्यासारखं गतीशील व्हायला शिकवा. शाळेतून बाहेर पडल्यानंतर त्याला ही समज यावी की आपण पाण्यासारखं कधी गतीशील तर कधी स्थीर व्हावं आणि कधी दगडासारखं कठोर व्हावं याचे धडे तुम्हीच त्याला द्या.
माझ्या लेकाच्या चेहर्यावर ओढून ताणून हास्य आणण्यापेक्षा त्याला एकाद्या वेळेस मार देऊन हसायला शिकवा. त्यामुळे मार दिल्यानंतर हसण्यापेक्षा रडणं किती अद्भूत आहे हेही त्याला शिकवा. त्याला सांगा रडणं हे फक्त मुलींचं काम नाही तर मन शांत आणि हलकं करण्यासाठी ती सहज एक मनाची प्रतिक्रिया आहे. वास्तवात रडणं ही एक प्रचंड मोठी ताकद आहे हे त्याला सांगा, कमजोरपणाची निशाणी म्हणजे रडणे नव्हे हे त्याच्या मनावर शेवटपर्यंत बिंबवा, आणि कुणासमोर तरी रडण्याची त्याला कधीच लाज वाटू देऊ नका
मला माहिती आहे शाळा म्हणजे जादूची कांडी नव्हे. लहान मुलांना या गोष्टी शाळेबरोबरच घरातच शिकवल्या जातील तेव्हा ती मुलं हे आपोआप शिकतील. मी आई म्हणून तुम्हाला एक वचन देते की या पत्रातून मी खूप काही गोष्टी तुमच्याकडे मागितल्या आहेत पण त्या मी त्याला घरातसुध्दा देण्याचा प्रयत्न करीन. पण मला एका गोष्टीची भिती वाटते की, तुम्हीही जुन्या परंपरेनुसार त्याला अभ्यासाचा रट्टा मारण, ढिगभर गृहपाठ, परीक्षेचा ताण अभ्यास द्याल आणि तो ते करणार नाही त्याच्या आई वडीलांनाच कराव्या लागणार. तुम्हीही जर असाच शिक्षणाचा पाढा त्याच्यासमोर ठेवला तर मी ही तेच करीन आणि त्याला माझ्या मनातल्या गोष्टी सांगता येणार नाहीत. मग तो चांगला माणूस बनण्यापासून दूर जाईल आणि माझ्या एवढ्याच तुम्हीही त्याला जबाबदार असाला. चांगल्या समाजनिर्मितीसाठी शिक्षक एक जबाबदार घटक आहे, आणि त्याच्या वाहवत जाण्याला मग शिक्षक म्हणून तुम्ही जबाबदार असाला.
मी हे पत्र संपवाताना एका साध्या सामान्य रिक्षावाल्याची गोष्ट आठवते ती तुम्हाला सांगावीशी वाटते, एक रिक्षावाला म्हणाला की या दुनियेत जन्म घेणारा प्रत्येक माणूस एकावेळचं पोट कसं भरावं हे जाणून असतो. पण कुणाचे आशीर्वाद, दुआ घेणं कुणाला नाही कळत. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की माझ्या मुलासह शाळेतील प्रत्येक मुलाला कुणाचा तरी आशीर्वाद, दुआ घ्यायला शिकवा.
एक आई
लेखक :
सत्याग्रहमधून मनीषा यादव यांचे पव
अनुवाद : Mahadev Parvati Ramchandra